मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, आता मला तुमची संवेदनशीलता बघायची आहे

You are currently viewing मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, आता मला तुमची संवेदनशीलता बघायची आहे

पुणे, दिनांक 9 एप्रिल 2025

-उच्च न्यायालयाचा निर्णय काल रात्री आला. ठेकेदार बीव्हीजी (हणमंत गायकवाड), सुमित, एसएसजी यांना  सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा फायदा करून देण्याचा आरोप असलेल्या निविदा प्रक्रियेसंदर्भात राज्य शासनाने चार आठवड्यांच्या आता निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
– याची अंमलबजावणी झाली तर आरोग्य विभागाच्या दर वर्षीच्या साडे तीन हजार कोटी पैकी हजार किती रुपये केवळ या तीन ठेकेदारांना द्यावे लागतील.
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वच्छ आहेत असा दावा करतात पण त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेला या अस्वच्छ निर्णयाचे ते काय करतात, ते किती संवेदनशील आहेत हे आता पाहायचे आहे.
– पत्रकार भावा आणि बहिणींनो, आपण दीनानाथ वर खूप तुटून पडलो. सरकारी हॉस्पिटल लुटणाऱ्या या गैरप्रकारांबाबत बोलणार आहोत की नाही. सरकारी आरोग्यवस्थेचे खरे गुन्हेगार हेच आहेत.

-दीपक जाधव
जागल्या आरोग्य हक्क समिती

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply