पुणे, 9 जून 2022
पुण्यातील पत्रकार भवन येथे रविवारी, दि. 12 जून रोजी सायंकाळी 6 वाजता खाजगीकरणाच्या जनताविरोधी व कामगारविरोधी धोरणाविरुद्ध एक कृती कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे. देशभर खाजगीकरणाविरुद्ध एल्गार पुकारला जाणार आहे, त्याची सुरुवात पुण्यातून होत आहे.
ऑल इंडिया पंजाब नॅशनल बँक ऑफिसर्स असोसिएशन ( AIPNBOA ) Pune ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशन ( AISMA ) , सेंट्रल रेल्वे ट्रॅकमेंटेनर्स यूनियन ( CRTU ) , कामगार एकता कमिटी ( KEC ) , महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडेरेशन ( MSEWF ) , पुणे जिल्हा बँक कर्मचारी असोसिएशन ( PDBEA ) , सबोर्डीनेट इंजीनियर्स असोसिएशन ( MSEB ) संघटनांनी गुरुवारी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन 12 जूनच्या कार्यक्रमाची घोषणा केली.
1991 मध्ये उदारीकरण आणि खाजगीकरणाद्वारे जागतिकीकरणाचे नवीन आर्थिक धोरण सुरू झाल्यापासून केंद्रातील आणि बहुतेक राज्यांमधील विविध सरकारे भारतीय आणि परदेशी अशा मोठ्या कॉर्पोरेट्सच्या फायद्यासाठी ते धोरण लागू करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.

सुरुवातीपासूनच कामगारांच्या विविध संघटना , सरकारी विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील घटकांच्या खाजगीकरणाविरोधात लढा देत आहेत . देशभरात आणि अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्रात विविध स्वरूपात आणि विविध नावांनी ( उदा . कॉर्पोरटीकरण , विनिवेश आउटसोर्सिंग , कंत्राटीकरण , सार्वजनिक – खाजगी भागीदारी , जमिनीसह मालमत्तेचे मुद्रीकरण , राष्ट्रीय मुद्रीकरण पाइपलाइन इ . ) खाजगीकरण लागू केले जात आहे . खाजगीकरण हे केवळ संबंधित कामगारांच्या हिताच्या विरोधात नाही तर त्या उपक्रमाच्या सेवा वापरणाऱ्या सर्वावरही त्याचा विपरित परिणाम होतो.
खाजगीकरणामुळे जास्तीत जास्त नफा मिळतो व परिणामी सेवांच्या किमती वाढतात , जे सर्व उपभोक्त्यांच्या हिताच्या विरुद्ध आहे .
उत्साहवर्धक हे आहे की रेल्वे , वीज , बँकिंग , विमा , दूरसंचार , संरक्षण उत्पादन , आरोग्यसेवा , पोलाद , कोळसा आणि पेट्रोलियम अशा विविध क्षेत्रातील कामगार देशभरातून एकत्र आले आहेत आणि भारतीय लोकांच्या जीवनावर आणि उपजीविकेवर केंद्र आणि राज्य सरकारांच्या हल्ल्यांविरुद्ध मोठ्या धैर्याने आणि दृढनिश्चयाने लढा देत आहेत.
त्यांचे योग्य म्हणणे आहे की या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि सरकारी युनिट्सद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सेवा खाजगी मालकांना जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या उद्देशाने चालवल्या जाऊ शकतील अशा नाहीत.
हा संदेश आपल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे कारण त्यांना खाजगीकरणाचे घातक परिणाम भोगावे लागतील या हल्ल्यांच्या विरोधात संयुक्तपणे कृती योजना तयार करण्यासाठी आणि खाजगीकरण थांबवण्याच्या दिशेने काम करण्यासाठी देशातील विविध भागातील कामगार आणि लोकांच्या संघटना एकत्र येत आहेत .
आम्ही रविवार , 12 जून 2022 रोजी सायंकाळी 5:30 वाजता पत्रकार भवन , पुणे येथे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि संघर्षाला पुढे नेण्यासाठी एक कार्यक्रम आखण्यासाठी भेटत आहोत असे सर्व कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.