उच्च न्यायालयासाठी वकिली करताना मराठी भाषेवर प्रभूत्व असणे हे बलस्थान – ॲड. मधुकर रामटेके

You are currently viewing उच्च न्यायालयासाठी वकिली करताना मराठी भाषेवर प्रभूत्व असणे हे बलस्थान – ॲड. मधुकर रामटेके

तळेगाव, दिनांक 2 फेब्रुवारी 2025

“उच्च न्यायालयातील सर्व कामकाज हे इंग्रजी भाषेत चालते आपले जे काही शेतीसंदर्भातील वा इतर मूळ दस्ताऐवज आहेत ते मराठीत आहेत. येथे कामकाज करणारे ॲड. हे मोठ्या प्रमाणत इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेउन आलेले असल्याने त्यांना मूळ मराठी दस्ताऐवज वाचणे आणि त्यांची मूळातून उकल करणे कठीण जाते. आपले सातबारा, ८ अ, फेरफार, कढईपत्र, इनामी सनदी या मराठीमध्येच आहेत. त्यांचे भाषांतर काय आणि कसे करणार असा प्रश्न उभा राहत असल्याने मूळ दस्ताऐवजांची मराठीमधून उकल करून सांगणे संयुक्तिक ठरते, म्हणून उच्च न्यायालयात वकिली करताना मराठी भाषेवर प्रभूत्व असणे हे बलस्थान आहे.” असे गौरोद्‌गार वडगाव मावळ न्यायालयातील ॲड. मधुकर रामटेके यांनी काढले.

नुकत्याच झालेल्या ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडया’च्या निमित्ताने इंद्रायणी महाविद्यालयाच्या मराठी विभागाने आयोजित केलेल्या ‘मराठी भाषा आणि न्यायालयीन कामकाज’ या विषयावर ॲड. रामटेके यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, डॉ. विजयकुमार खंदारे, डॉ. संदीप रतन कांबळे, डॉ. सदाशिव मेंगाळ, प्रा. काशिनाथ अडसूळ, डॉ. मधुकर देशमुख आदी उपस्थित होते

यावेळी मराठी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात मराठी विभागाची आजतागायत कशी घोडदौड सुरू आहे, यावर भाष्य करून दि. १४ ने २८ जानेवारी २०२५ दरम्यान विभागाने आयोजित केलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यात पुस्तक परीक्षण एक कला, सुंदर माझे हस्ताक्षर, सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा आणि मराठी भाषा आणि न्यायालयीन कामकाजात या कार्यक्रमांचा सहभाग असल्याचे सांगितले.

द ॲड. रामटेयालयीन कार्यकारिणी म्हणाले, “मराठी शब्दांत समस्या निर्माण करताना समस्या निर्माण केली जाते, त्यांना सप्रमाण्यता दिली जाते. तसेच खालच्या कोर्टात मात्र मराठीत दिले जाते. त्याचे कागदपत्र, निकाल सर्वोच्च न्यायलयात खटले आणि त्यांचे निकालपत्र उपलब्ध आहे. द्यायला तयार केले आहेत, त्यांनीही त्यांनी ‘इंडियन पिनल’पासून प्रवास केला आहे सांगितला तसेच विशेषत महिलांच्या संदर्भातील ९७ ते ११६ कलमाची माहिती दिली.

वाचाळ प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी अध्यक्षीय भाषा मराठी भाषा आणि शिक्षण, समाज, न्यायव्यवस्था, व्यवस्था सहसंबंध अधोरेखित केला. फारसी, उर्दू, इंग्रजी भाषांचा ॲड. रामटेके यांनी उल्लेख केला आहे.

प्रा डॉ संदीप कांबळे यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा सुरेश देवढे यांनी आभार मानले.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply