पुणे, दिनांक 4 एप्रिल 2025
महाराष्ट्र नर्सिंग होम ॲक्टनुसार राज्यातील कोणत्याही खाजगी हॉस्पिटलला ऍडव्हान्स किंवा डिपॉझिट मागण्याचा अधिकार नाही. हॉस्पिटलने अशी मागणी केल्यास महापालिका, जिल्हा परिषद तसेच सिव्हिल सर्जन यांच्याकडे तक्रार करण्याची तरतूद कायद्यात आहे. त्यानंतर महापालिकेच्या तक्रार निवारण कक्षाने 24 तासाच्या आत यावर सुनावणी घेणे बंधनकारक आहे.
मात्र आजतागायत अशी एकही तक्रार महाराष्ट्रात नोंदवली गेलेली नाही.
यापुढील काळात अशी तक्रार करण्याची कुणाही रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांची तयारी असल्यास त्यांना जागल्या आरोग्य हक्क समितीकडून शक्य मदत करू.
आयएमएने तातडीने याबाबतचे निर्देश त्यांच्या डॉक्टरांना द्यावेत अन्यथा आम्ही कायदेशीर लढा देण्यास सुरुवात करीत आहोत. डॉक्टर व रुग्ण नाते जपले पाहिजे ही आमची भूमिका पण तुम्ही पैशांपायी आमच्या जीवावर उठणार असाल तर कसे सहन करायचे?
दीपक जाधव
जागल्या आरोग्य हक्क समिती
संपर्क – 9922201192