पुणे, दिनांक 5 एप्रिल 2025
दीनानाथ रुग्णालय यापुढे कोणत्याही इमर्जन्सी पेशंटकडून डिपॉझिट किंवा ॲडव्हान्स घेणार नाही असे निवेदन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
दीनानाथ रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत दाखल झालेल्या गर्भवती महिला महिलेला 10 लाख रुपये ऍडव्हान्स भरण्यास सांगितले गेले. तीन लाख रुपये भरण्याची तयारी नातेवाईकांनी दाखवली असतानाही संपूर्ण रक्कम भरल्याशिवाय उपचार करण्याचे नाकारण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या हॉस्पिटलला त्या महिलेचा मृत्यू झाला.
याप्रकरणी तीव्र संताप समाजातून व्यक्त करण्यात आल्यानंतर अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने यापुढील काळात कोणत्याही इमर्जन्सी पेशंट कडून डिपॉझिट किंवा ॲडव्हान्स घेतले जाणार नाही असे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी निवेदनाद्वारे जाहीर केले आहे.