कार्यकर्त्यांना बळ देणारा पक्ष ‘राष्ट्रवादी’ पक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज, म्हणजे १० जून रोजी २३ वा वर्धापनदिन आहे. कोणतीही संघटना, राजकीय पक्ष किंवा संघटनेचा वर्धापनदिन हा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी अभिमानाचा क्षण असतो. त्याचबरोबर आतापर्यंतच्या वाटचालीचे सिंहावलोकन करत पुढील प्रवासाचा निर्धार करण्याचा क्षण असतो.
काँग्रेसप्रणित काळातील हरितक्रांतीमुळेच आजची निर्यातवाढ
स्वातंत्र्यप्राप्तीच्या टप्प्यावर भारतीय शेती भरकटलेली, गोंधळलेली, दिशाहीन व धोरणशून्य होती. मान्सूनच्या लहरीपणावर शेतीचा जुगार चालायचा. त्यावेळच्या जेमतेम ४० कोटींच्या आतील लोकसंख्येची पोटापाण्याची गरज भागविता येणेही कठीण ठरावे इतकेच अन्नधान्य उत्पादन होते. भारतास अमेरीकेकडून लाल मिलो मागवावा लागत होता.
एकनाथ ढोले यांची आम आदमी पक्षाच्या शहर संघटक पदी नियुक्ती
शिवसेनेच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष, माजी विभागप्रमुख एकनाथ ढोले यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. आपच्या शहर संघटक पदी त्यांची निवड करून त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले आहे.
धार्मिक उन्माद निर्माण करून समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवावा
आम्ही स्वत: देखील हरी-नाम, नामस्मरण व अखंड हनुमान चालीसाचे सप्ताह - अखंडीत केले आहेत. त्यामुळे हनुमान चालीसाचे महत्व व त्याचे गांभीर्य आमचे ठायी पुरेपूर आहे. तरी धार्मिक उन्माद निर्माण करण्याचा पोरकटपणा करणाऱ्यांना जनता रस्त्यावर येऊन धडा शिकवेल.
केंद्र सरकारकडून ‘जेष्ठ नागरीक रेल्वेभाडे सवलत’ बंद, काँग्रेसकडून आंदोलनाचा इशारा
‘रेल्वे भाड्यातील सवलतीवरचे निर्बंध कायम राहतील’ आणि त्यांनाही इतर प्रवाशांप्रमाणे पूर्ण भाडे भरावे लागेल, असा निर्णय रेल्वेने घेतल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत बुधवारी सांगितले.