श्री देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र
तुम्ही रविवारी (23 मार्च) पुणे दौऱ्यावर होतात, बालेवाडी व गणेश कला क्रीडा मंदिर येथे तुमचे कार्यक्रम होते. यावेळी शहरातून तुमचा ताफा जात असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व केळकर चौकात ॲम्बुलन्स अडवल्या गेल्याचे वृत्त आज दैनिकांमध्ये प्रकाशित झाले आहे.
हे वाचून एक आरोग्य हक्क कार्यकर्ता म्हणून मी खूप व्यथित झालो आहे. आपले वैचारिक मतभेद असले तरी तुम्ही पोलिसांकडून झालेल्या या कृत्याचे समर्थन करणार नाही असे मला वाटते.
तुम्हा मंत्र्यांचे ताफे शहरातून जात असताना सामान्य नागरिकांना उन्हा-तानात खूप वेळ थांबून ठेवले जाते, कृपया हे टाळता आले तर नक्की पहा.
-दीपक जाधव, आरोग्य हक्क कार्यकर्ता, पुणे