मूल्यात्मक राजकारणाचा चांगला पायंडा या पुरस्काराने घालून दिला आहे

You are currently viewing मूल्यात्मक राजकारणाचा चांगला पायंडा या पुरस्काराने घालून दिला आहे

गरवारे हायस्कूल येथे पुरस्कारचे वितरण

पुणे, दिनांक 16 फेब्रुवारी 2025
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे न. म. जोशी यांच्याकडून काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांना पुरस्कार दिला गेला आहे. ही एक संवादाची चांगली प्रक्रिया असून ती निरंतर सुरू रहावी. मुल्यात्मक राजकारण कसे असावे याचा हा एक चांगला पायंडा यानिमित्ताने घालून दिला आहे. 


स्व. म. वा. जोशी यांचे स्मरणार्थ दिला जाणारा यंदाचा (2024-2025) चा “अन्नब्रम्ह” हा पुरस्कार पुणे शहरातील नामांकित “श्री मुरलीधर व्हेज” पूर्वाश्रमीचे (मुरलीधर भोजनालय) : (संचालक ‘श्री व सौ शारदा गोपाळ तिवारी कुटुंबीय) यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी आमदार उल्हासदादा पवार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपालजी सबनीस, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी उपस्थित होते.
न. म. जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले, अनेक विद्यार्थी, नोकरदार व चोखंदळ पुणेकर यांना सकस जेवण उपलब्ध करून देण्याचा सेवाभाव मुरलीधर भोजनालय यांनी जोपासला आहे. बाहेरगावावरून पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना अल्पदरात त्यांच्याकडून भोजन उपलब्ध करून दिले जात आहे. 


सरकारला उत्तर देताना गोपाळदादा तिवारी म्हणाले, “सेवा करणाऱ्यांचा गौरव न. म. जोशी सरांनी केला त्याबद्दल सामजिक कृतज्ञता व्यक्त करतो.  आमची सेवा गेली 63 वर्षे सुरू आहे. मी सातवीमध्ये असताना आईचे निधन झाले, त्यामुळे कुटुंबातील जबाबदाऱ्या लवकर उचलाव्या लागल्या. दीड वर्षे ट्रक चालवला. युवक काँग्रेसमध्ये कार्यरत झालो, 1992 ला नगरसेवक म्हणून निवडून आलो. मी राजकारणात व्यस्त असताना माझ्या पत्नीने आणि नंतर मुलाने ही जबाबदारी पार पाडली. व्यवसाय करत असताना सामजिक दायित्व सांभाळण्याचा प्रयत्न केला. मुरलीधर मंदिर हेरिटेज मंदिर आहे, त्याच्या सानिध्यात हे मुरलीधर भोजनालय आहे. ही सेवा पुरवण्यात आमच्या कामगारांचा वाटा मोठा आहे.”


श्रीपाल सबनीस म्हणाले, “अन्नब्रम्ह पुरस्कार हा विकला न जाणारा पुरस्कार आहे. यानिमित्ताने गुरूनी पेन्शनमधून आपल्या विद्यार्थ्याला 5 हजार रुपये दिले आहेत ही खास बाब आहे. कामगारांची आठवण ही आवर्जून ठेवली गेली. गोपाळराव यांचे आई-वडील व कुटुंबीयांनी सेवाभाव जपण्याचे काम केले आहे, तीच परंपरा पुढे चालवली जात आहे.”

पराग काळकर म्हणाले, “दरवर्षी 4 लाख विद्यार्थी पुण्यात शिकायला येतात. विद्यार्थ्यांसाठी आज फूड स्कॉलरशिप सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या सेवेचे मूल्य खूप जास्त आहे. यापुढील काळात ही असेच योगदान द्यावे अशी अपेक्षा आहे.” 


उल्हास दादा पवार म्हणाले, “मराठ्यांची संग्राम गीते ही दुर्गाप्रसाद तिवारी यांनी लिहिली. तिवारी कुटुंबीय हे महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या काळात आले असून त्यांच्या अनेक पिढ्या महाराष्ट्रात राहत आहेत. मुरलीधर भोजनालय येथील जेवणाचा आस्वाद विलासराव देशमुख यांच्यापासून पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी घेतला आहे. खाद्यसंस्कृती ही खूप महत्त्वाची आहे. जेवताना विचारांची देवाण-घेवाण चांगली होती, आता त्याला डिनर डिप्लोमसी म्हणतात. वडीलांच्या इतकेच निष्ठेने गोपाळराव सेवेचा परंपरा पुढे चालवत आहेत.”

प्रसाद जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर गोपाळदादा तिवारी यांनी आभार मानले.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply