आरोग्यावरील खर्च दुप्पट करण्याचे आश्वासन, पण बजेट गरजेपेक्षा निम्मेच!

"राज्याच्या आरोग्याचे बजेट दुप्पट करू” अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना केली होती. त्यानंतर निवडणुका होऊन पुन्हा सत्तेवर आलेल्या महायुती सरकारला मात्र या आश्वासनांचा पूर्ण विसर पडला असून आरोग्य क्षेत्रासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात अपुरी तरतूद करण्यात आली आहे.

  • Reading time:2 mins read

अंजली ताई, तुम्हाला जागल्याचा सॅल्यूट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खास मित्र व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उजवा हात असल्याने धनंजय मुंडे यांना पूर्ण अभय मिळाले होते. मात्र पाशवी बहुमताने सत्तेवर आलेल्या बेधुंद सरकारला एक महिला सळो की पळो करून सोडू शकते, हे अंजली दमानिया यांनी दाखवून दिले आहे. चळवळीतला प्रत्येक कार्यकर्त्याची उमेद वाढवणारी ही बाब आहे. प्रत्येक गावागावात अशा दमानिया उभे राहण्याची गरज आहे. अंजलीताई, तुम्हाला जागल्याचा सॅल्यूट.

  • Reading time:1 mins read

कस्तुरबा वसाहत येथे वंचितांच्या नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कस्तुरबा वसाहत येथे 1 मार्च 2025 रोजी संध्याकाळी मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्यावतीने जागल्या वंचितांचे नाटक हा प्रयोग सादर करण्यात आला. वस्तीतील महिला व लहान मुलांनी स्वतः नाटकांमध्ये सहभागी होऊन याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

  • Reading time:1 mins read

भाषेच्या प्रत्येक शिक्षकाने जर हे पुस्तक वाचले तर मराठी भाषेला खूप फायदा होईल

डॉ. नवनाथ तुपे यांचे 'वाचन दिशा आणि दृष्टिकोन' यांसारखे वाचनाची कला आणि वाचनाचे शास्त्र या विषयावर मराठीत इतके सुरेख आणि प्रभावी पुस्तक मी दुसरे पाहिले नाही. वाचन हे श्वासोच्छ्‌वासाइतकेच सोपे आणि नैसर्गिक आहे, असा सर्वसाधारण समज असला तरी त्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास आपल्याला असे लक्षात येते की, वाचन ही एक गुंतागुंतीची न्यूरोलॉजिकल, समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे.

  • Reading time:1 mins read

महाविद्यालयातील सीएचबी प्राध्यापकांना पूर्ण वेतन लागू करावे

नेट-सेट, पीएच.डी धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य (NET-SET, Ph.D. Dharam Samiti, Maharashtra State) यांच्या वतीने येत्या २० फेब्रुवारी २०२५ रोजी पुणे येथील संचालक कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन व २१ फेब्रुवारी २०२५ रोजी  पुणे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मुंबईतील वर्षा निवासस्थानापर्यंत  पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

  • Reading time:1 mins read

मूल्यात्मक राजकारणाचा चांगला पायंडा या पुरस्काराने घालून दिला आहे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे न. म. जोशी यांच्याकडून काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांना पुरस्कार दिला गेला आहे. ही एक संवादाची चांगली प्रक्रिया असून ती निरंतर सुरू रहावी. मुल्यात्मक राजकारण कसे असावे याचा हा एक चांगला पायंडा यानिमित्ताने घालून दिला आहे. 

  • Reading time:1 mins read

महात्मा फुले जन आरोग्य योजना गुंडाळण्याचा शासनाचा प्रयत्न हाणून पाडूयात

शासनाला जर खरच पैशांची बचत करायची असेल तर 8 हजार कोटींचे 108 अँब्युलन्स टेंडर रद्द करून ती सेवा स्वतः शासनाने कार्यान्वित केल्यास सरकारचे शेकडो कोटी वाचतील (मात्र यातून मोठा मलिदा मिळत असल्याने तसेच यात आता एका मंत्र्यांच्याच मुलाची भागीदारी असल्याने ते हे करणार नाहीत) मात्र कुठल्याही परिस्थितीत महात्मा फुले योजनेला धक्का लावू दिला जाणार नाही, हे शासनाने नक्की लक्षात ठेवावे.

  • Reading time:1 mins read

केरळमध्ये हे होऊ शकते तर महाराष्ट्रात ही नक्की शक्य आहे

केरळचे म्हणून मला जे काही वेगळेपण जाणवले तेवढेच इथे नोंदवण्याचा लहानसा प्रयत्न मी केला आहे. हे अशी व्यवस्था जर केरळमध्ये शक्य आहे तर महाराष्ट्रात देखील शक्य आहे ही आशा पल्लवित झाल्याशिवाय राहणार नाही.

  • Reading time:2 mins read

मुस्कानच्या तर्कशुद्ध मांडणीने सगळ्यांनाच भारावून टाकले

दीपक जाधव मासिक पाळीच्या विषयावर आम्ही नाटकाचा अर्धा भाग सादर केला आणि नाटक फ्रिज अवस्थेत थांबले...आता प्रेक्षकांनी उठून येऊन उरलेले नाटक पूर्ण करणे अपेक्षित होते. अवघे 12 ते 13 वर्षांचे वय असलेली मुस्कान मोठ्या आत्मविश्वासाने ती पुढे आली. मासिक पाळीच्या विषयावर मुद्दा क्रमांक 1, 2 , 3 अशी अगदी जबरदस्त…

  • Reading time:1 mins read

वंचित घटकांचे आरोग्य रक्षण करणाऱ्या योजनांवरील बजेटमध्ये कपात दुर्दैवी

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करणाऱ्या आणि समाजातील सर्वात वंचित घटकांचे आरोग्य रक्षण करणाऱ्या योजनांववरील ( उदा. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना (PMSSY), पोषण योजना) बजेट मध्ये कपात करण्यात आली हे.

  • Reading time:2 mins read

End of content

No more pages to load