भाषेच्या प्रत्येक शिक्षकाने जर हे पुस्तक वाचले तर मराठी भाषेला खूप फायदा होईल
डॉ. नवनाथ तुपे यांचे 'वाचन दिशा आणि दृष्टिकोन' यांसारखे वाचनाची कला आणि वाचनाचे शास्त्र या विषयावर मराठीत इतके सुरेख आणि प्रभावी पुस्तक मी दुसरे पाहिले नाही. वाचन हे श्वासोच्छ्वासाइतकेच सोपे आणि नैसर्गिक आहे, असा सर्वसाधारण समज असला तरी त्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास आपल्याला असे लक्षात येते की, वाचन ही एक गुंतागुंतीची न्यूरोलॉजिकल, समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे.