अंजली ताई, तुम्हाला जागल्याचा सॅल्यूट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खास मित्र व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उजवा हात असल्याने धनंजय मुंडे यांना पूर्ण अभय मिळाले होते. मात्र पाशवी बहुमताने सत्तेवर आलेल्या बेधुंद सरकारला एक महिला सळो की पळो करून सोडू शकते, हे अंजली दमानिया यांनी दाखवून दिले आहे. चळवळीतला प्रत्येक कार्यकर्त्याची उमेद वाढवणारी ही बाब आहे. प्रत्येक गावागावात अशा दमानिया उभे राहण्याची गरज आहे. अंजलीताई, तुम्हाला जागल्याचा सॅल्यूट.