सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य

You are currently viewing सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य

विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो नमस्कार,

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने केलेली पीएच.डी., एम.ए., वसतिगृह आदींची अन्यायकारक शुल्कवाढ रद्द व्हावी व इतर मागण्यांसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रशासनाकडे पाठपुरावा केला. भर पावसात तीन दिवस आंदोलन केले. विद्यार्थी एकजुटीची मोठी ताकद आपण प्रशासनाला दाखवून दिली आहे.

आपल्या काही मागण्या प्रशासनाने लगेच मान्य केल्या आहेत. तर उर्वरित मागण्या योग्य त्या अधिकार मंडळांच्या मंजुरी घेऊन मान्य करण्याचे लिखित आश्वासन दिले आहे.त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर त्यांनी केलेला जल्लोष

प्रशासनाने दिलेली लिखित आश्वासने पूर्ण होईपर्यंत आपल्याला अजून प्रयत्न करावेच लागणार आहेत. ते आपण करालच यात शंका नाही.

सर्वात मुख्य बाब म्हणजे विद्यापीठातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना एक इशारा यातून नक्कीच मिळाला आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या शुल्कातून जमा होणारा 600 कोटींचा विद्यापीठ फंड म्हणजे आपल्याला मिळालेली जहागिरी आहे, असा समज काही अधिकाऱ्यांचा झाला आहे. जर हे थांबले नाही तर श्रीलंकेत घडले अगदी तसेच विद्यापीठ सोडून पळ काढण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते असा संदेश ही यातून त्यांच्यापर्यंत पोहचला असावा, अशी अपेक्षा आहे.

लढेंगे, जितेंगे।

– दीपक जाधव
संपादक, जागल्या वेब पोर्टल

संपर्क – 9922201192

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply