रमाई आंबेडकर नगर येथे मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या चौथ्या केंद्राचे उदघाटन

You are currently viewing रमाई आंबेडकर नगर येथे मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या चौथ्या केंद्राचे उदघाटन

पुणे, दि. 25 डिसेंबर 2022

वाढत्या धकाधकीच्या जीवनात, तरुण पिढी मनोरंजनासाठी मोबाईल आणि विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी गेल्याचे आपण ऐकत असतो, वाचत असतो. पण हेच चित्र बदलण्यासाठी मनोदय व्यसनमुक्ती संस्था पुणे शहरात वस्ती पातळीवर भरीव काम करत आहे.

तरुण पिढीचे मानसिक, शारीरिक, बौद्धिक आरोग्य उत्तम रहावे आणि सर्वजण व्यसनांपासून दूर रहावेत ह्यासाठी मनोदय संस्था जाणीवजागृती, समुपदेशन, प्रतिबंधात्मक उपाययोजना या मुख्य आयमांवर काम करत आहे. प्रबोधन सत्रे, व्यक्तिमत्व विकास उपक्रम, वैचारिक उंची वाढण्यासाठी ग्रंथालय, वाचन कट्टा, चित्रपट कल्ब, मैदानी खेळ, सहली असे वेगवेगळ्या उपक्रमांचा यात नावीन्यपूर्ण पद्धतीने समावेश आहे.

याच अनुभवाच्या यशातून रमाई आंबेडकर नगर, (ताडीवाला रोड) श्री सिद्धेश्वर तरुण मंडळाच्या आवारात, ताडीवाला रोड पोलीस चौकी समोर नवीन चौथे केंद्र सुरू करण्यात आले. याचा उद्घाटन या कार्यक्रमाला स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सुजित अप्पा यादव, डॉ. मयूर गायकवाड, संदीप कांबळे, नरेश रामोशी यांचे विशेष सहकार्य लाभले.


या एक दिवसीय उद्घाटन कार्यशाळेत मुला-मुलींनी विविध सत्रांचा आनंद घेतला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्त्या नंदिनी जाधव आणि डॉ. नितीन हांडे यांनी ‛समाजातील अवैज्ञानिक रूढी परंपरा’ यावर सत्र घेतले. मुलांना चिकित्सक पद्धतीने विचार करण्याची दृष्टी देत त्यांना विविध वैज्ञानिक प्रयोग करून दाखवले. ‛का ?’ हे सूत्र सर्वांना यातून मिळाले.

धर्मा पाडळकर यांनी कला आधारित (ABT) सत्र घेतले. ज्यातून मुली-मुलांच्या अभिव्यक्ती कौशल्याला वाव देण्यासाठी सुंदर सत्र झाले. झुंबा ट्रेनर पूजा देशपांडे यांच्या झुंबा च्या सत्रामध्ये सर्वांनी मनसोक्त नृत्याचा आनंद लुटला.

सामान्यतः उद्घाटन कार्यक्रमातील भव्यता, दिखाऊपणा बाजूला ठेवून मुली-मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषण ठरतील अश्या सत्राची गुंफण या एक दिवसीय कार्यशाळेत होती, हे विशेष. कार्यक्रम संपल्यानंतर मुला-मुलींनी दिलेल्या प्रतिक्रियांमधून पुढील अश्याच उपक्रम – कार्यक्रमांसाठीची उत्सुकता जाणवत होती.
ह्या वेळेस, कार्यक्रमाला स्थानिक नागरिक वर्षा समतानी, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. विष्णू श्रीमंगले व संस्थेचे इतर पदाधिकारी अक्षय कदम, मैत्रेयी पाध्ये, सुजाता कांबळे, प्रज्ञा जाधव, प्रतीक्षा हा उपस्थित होते.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply