जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती आणि चर्चासत्राचे आयोजन

You are currently viewing जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती आणि चर्चासत्राचे आयोजन

पुणे, दि. 27 जून 2022

व्यसन सोडण्याची इच्छा असलेल्या सर्व लोकांना मदत करण्याबरोबरच वस्ती पातळीवर १३-२२ वयोगटातील मुलां-मुलींनी व्यसनी होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांच्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकासासाठी विविध उपक्रम राबवत जातात.

जाणीवजागृतीच्या उपक्रमाचा भाग म्हणून २६ जून रोजी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त गांधी नगर, जयप्रकाश नगर मध्ये ग्रीनतारा फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात एक मार्गदर्शन केले आणि मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या पाटील इस्टेट, शिवाजी नगर येथे पण तरुणाई सोबत मार्गदर्शन आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

त्यामध्ये मुलांना अमली पदार्थ म्हणजे काय? त्याचे प्रकार, कारणे, परिणाम आणि एनडीपीएस (NDPS) कायदा बद्दल माहिती दिली तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत सविस्तर चर्चा देखील करण्यात आले. मुलांनी खुप प्रश्न विचारून शकांचे निरसन करून घेतले. मनोदय व्यसनमुक्ती संस्थेचे संचालक डॉ. विष्णू श्रीमंगले आणि समुपदेशक अक्षय कदम यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply